आगामी मासिक सत्संग (महासभा) दि. २७ जुलै २०१९ (शनिवार), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

श्रीक्षेत्र गाणगापूर मासिक सत्संग महासभा दि. २५ मे २०१९ (शनिवार) वृतांत

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर 

प्रकाशन व लोकार्पित साहित्य : श्री स्वामी समर्थ सेवा अंक- जून, पंचामृत ग्रंथ, विवाह संस्कार अ‍ॅप.

परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजातील अमृतकण : 

* राज्यासह देशभरातून आज श्री क्षेत्र गाणगापूर येथे वार्षिक सत्संगासाठी आपला वेळ खर्ची घालून सर्वजण उपस्थित झालेले आहात. मे महिन्याच्या तीव्र उन्हात भूपाळी आरतीपासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण पठण, वाचन केले आहे, ही अतिशय कठीण तपश्चर्या आपण आज सर्वजण येथे पास झालेला आहात.

* प्रखर उन्हातही कर्मयोग्याची भूमिका घेऊन सलग पूर्ण पारायण करत, भगवान श्री दत्तात्रेयांच्या पुण्यभूमीत सर्वांना फार मोठा आशीर्वाद ह्या वाचनाच्या फलश्रृती रुपात मिळणार आहे. ही सेवा म्हणजे राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहे, सेवेकर्‍यांनी केलेली सेवा आज श्री गुरुचरणी विलीन केलेली आहे.

* दुष्काळाची दाहकता बघता, पाणी नाही, पाऊस नाही, अनेक कुटुंबे शहराकडे स्थलांतरित होत आहेत, अशा अशाश्वत परिस्थितीत भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणांवर श्री गुरुचरित्र रुपी प्रार्थना करत लवकरच मृग नक्षत्रात देशभरात चांगले पर्जन्यमान व्हावे, सुवृष्टी व्हावी, शेती चांगली पिकून, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, देशातील धर्मांतरे थांबावीत आणि या देशवासियांना शांतता, समाधान, सौख्य लाभावे या उद्देशाने हा सत्संग आयोजित केला आहे.

* श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री गुरुपीठ म्हणजे सर्वांसाठी एक हक्काचे ठिकाण मिळाले आहे, येथे दु.12.30 वा.माधुकरी मागण्याची परंपरा फार पुरातन काळापासून आहे परंतु कालमानपरत्वे सदगुरु पिठले महाराजांनी ह्यामध्ये काही सूचक सूचवले की वृद्ध माणसे दु. 12.30 पर्यन्त काही न खाता उपाशी राहू शकत नाहीत, मधुमेह, रक्तदाब अशा शारीरिक आजारांमुळे माधुकरीची ही संकल्पना त्यांना मानवणारी नाही, त्यांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी 10.30 वा. नैवेद्य आरती व महाप्रसाद येथील श्री गुरुपीठात सर्वांपर्यन्त पोहचविला जातो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे येणार्‍या सर्वच भाविकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

* देशातील सर्वच श्री दत्तापीठांमध्ये अन्नदानाला असाधारण महत्व साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांनी दिले आहे.

* सरस्वती मातेच्या चरणांपर्यन्त पोहोचणारी मुले सनदी अधिकारी झालेली आहेत. विद्यार्थ्यांनी सरस्वती मंत्र, स्तोत्र इ. जरूर करावी.

* जीवनातील दैनिक बाबींना दूर सारत राष्ट्रभक्ती, संरक्षण, दुष्काळ, पाणी टंचाई अशा समस्यांचा आता प्रकर्षाने विचार करावा व त्याच्या निरसनार्थ काही उपाययोजना ह्या सेवेतून कराव्यात.

* श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा, त्यांचीच ऊर्जा सर्व प्रश्नांची उकल करून अखिल मानवजातीला स्वास्थ, शांतता आणि मन:शांती देऊ शकते.

* श्री स्वामी चरित्राचे केवळ वाचन करायचे म्हणून करू नये तर त्याचा भावार्थ समजून ग्रंथाचे वाचन करायला हवे.

* ऋणांतून ऋणमूक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ दररोज केल्यास आपल्या कुटुंबाला एक वेगळी ऊर्जा, वेगळे स्वास्थ मिळत असते. ही कृती नव्या पिढ्यांसमोर प्रात्यक्षिक स्वरूपात करावी म्हणजे त्यांना ही पुढे ह्या कृतीचा विसर पडणार नाही, सेवेत सातत्य राहील.

* भांडवल, मनुष्यबळ असूनही शेती पिकत नाही, कारण बुडीताची शेती, बळजबरीने अतिक्रमणे केलेली असतात, ह्या सर्व समस्यांमधून मूक्तता मिळण्यासाठी देशभरातील सप्तनद्यांची माती शेतात किंवा प्लॅाट, वास्तू इ. ठिकाणी मध्यभागी पुरावी. ह्या उपायाने सौख्य, शांती, समृद्धी उपजत गुणांनी मिळू शकते.

* दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, निसर्गनिर्मित नाही. देशातल्या सर्वच नद्या ह्या जीवनदायिनी आहेत परंतु आज आपण सर्वत्र अस्वच्छता निर्माण करून ह्या जलदेवतांच्या कोपास पात्र ठरत आहोत.

* श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे सर्व विभाग म्हणजे एक-एक अध्यायच आहेत.

* घरात विवाहाच्या पूर्वी 15 दिवसआधी, 10 दिवसआधी, 7 दिवसआधी अथवा 5 दिवसआधी देवप्रतिष्ठा, ग्रहयज्ञ केल्यास कुठलीही समस्या अथवा अडचणी निर्माण होत नाहीत, निर्विघ्नपणे विवाहसोहळा व विवाहोत्तर जीवन पार पडते.

* सेवेकरी एकमेकांना भेटले की एक आदरयुक्त ऊर्जा एकमेकांची एकमेकांना मिळत असते.

* प्रेमभक्तीने ही ऊर्जा काकणभर अधिक प्रमाणात एकमेकांकडे कशी प्रसारीत करता येईल याचा विचार करावा.

* देशाचा उत्कर्ष हाच आपला सर्वांचा उत्कर्ष म्हणून देशसेवेस विशेष प्राधान्य देऊन सेवेत सहभागी व्हावे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क:

श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर : ०२५९४ – २३३१७० / २०४२५२

श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०

विवाह नोंदणी स्टॉल: संपर्क ७७५५९४१७१०

स्वयंरोजगार विभाग स्टॉल: संपर्क ७७५५९४१७५३

माहिती व तंत्रज्ञान विभाग अंतर्गत (सेवेकरी ओळखपत्र व SMS सेवा) स्टॉल : संपर्क ७७५५९४१७१५

कृषीशास्त्र विभाग स्टॉल: संपर्क ७७५७००८६५२

सर्व सेवेकरी/भाविकांनी बालसंस्कार, युवा प्रबोधन, विवाह संस्कार, कृषीशास्त्र, पशुगौवंश, स्वयंरोजगार, याज्ञिकी इत्यादी विभागातील प्रशिक्षणाचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

प्रशिक्षण स्थळ: अन्नछत्र बिल्डींग हॉल क्रमांक १,२,३

संपर्क: ७७५७००८६५२ / ७७५५९४१७१०