बालसंस्कार शिबिर अंतर्गत विश्वविक्रमीय स्तोत्र मंत्र पठण व वृक्षारोपण – २१ जुलै २०१९

बालसंस्कार शिबिर अंतर्गत 

वर्ल्ड रेकॉर्ड ॲक्टिव्हिटी

( स्तोत्र मंत्र पठण व वृक्ष संवर्धन )

दि. २१ जुलै २०१९

वेळ : सकाळी १०.४५ ते ११.४५ – स्तोत्र मंत्र पठण.  ।  दु. १ ते ३ वृक्ष लागवड व संवर्धन.

 

दिनांक २१ जुलै रोजी बालसंस्कार शिबिर अंतर्गत सामूहिक स्तोत्रमंत्र पठणाचा विश्वविक्रम व वृक्षारोपण उपक्रमाचे संपुर्ण महाराष्ट्र तसेच विदेशातही आयोजन

            अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक  सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्यावतीने सामूहिक स्तोत्र-मंत्र पठणाचा विश्वविक्रम करणे तसेच वृक्षारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

            या  सेवा कार्याच्या वतीने नियोजित उपक्रमाच्या माध्यमातून दिनांक २१ जुलै २०१९ सकाळी १०.४५ ते ११.४५ या वेळेमध्ये संपूर्ण  देशातील श्री स्वामी सेवा केंद्र व उपक्रमात सहभागी झालेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांकडून एकाच दिवशी आणि एकाच वेळी  सामूहिक पद्धतीने त्यांच स्मरणशक्ती,एकाग्रता व मानसिक विकास साधणारे स्तोत्र-मंत्रांचे सामूहिक पठण  घेण्यात येणार आहे तसेच त्याच दिवशी वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार आहे. या आगामी उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.