सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर(नाशिक) अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”

नाशिक शहरापासून २५ कि.मी. दूर असलेल्या त्र्यंबकेश्वर या डोंगराळ भागात ईश्वराने अवतार, तपस्वी ॠषीमुनी, साधुसंतातानी तपचर्याने सोबत सेवा दिलेली आहे आणि आता सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, च्या माध्यमातून या परिसरातील दीन, दलीतास आरोग्याची सेवा मिळणार आहे. २१ एकर विस्तार्ण परिसरात सर्व सुविधायुक्त आध्यामिक मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन झाले असून आध्यात्मिक व सात्विकतेच्या मार्गाने कार्याप्रबण असणा-यांचा श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने खालीलप्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत .

• हृदय (कार्डीआक केअर ) 
• नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी )
• किडनी (नेफ्रेलॉजी )
• कर्करोग (कॅन्सर)
• मेंदू (ब्रेनट्युमर, आँन्कॉलॉजी )
• बालरोग चिकित्सा (नीओ-नेटल , पोस्टनेटल केअर )
• स्त्रीरोग ( गायानेकॉलॉजी)
• अपघात
• वातव्याधी
• मधुमेह
• रक्तदाब

टीप: सर्व प्रकारचे आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र, श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर. अधिक माहितीसाठी क्लिक करा:

श्री जनकल्याण योजना: “प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी “
मिशन १ रुपया अभियानबद्दल थोडक्यात माहिती

सर्व प्रतिनिधी सेवेकरी बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वप्न असलेले मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. परमपूज्य गुरुमाऊलींचे हे स्वप्न सेवेकऱ्यांच्या कष्टाचा एक रूपयातून साकार होणार आहे. यासाठी आपण मिशन १ रुपया ही संकल्पना परमपूज्य आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रात सुरु करीत आहोत.

या संकल्पनेनुसार कुटुंबात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे एका दिवसाला प्रत्येकी एक रुपया दान या ईश्वरी कार्यासाठी आपण देणार आहोत . समजा एखाद्या सेवेकरी कुटुंबात ४ व्यक्ती आहेत . त्या कुटुंबाने दिवसाला फक्त ४ रुपये म्हणजेच महिनाभरात १२० रुपये या हॉस्पिटलसाठी देणे अपेक्षित आहे . सदर देणगी ही ऐच्छिक स्वरूपाचे असेल त्यापेक्षा जास्त किंवा आपल्या इच्छेनुसार आपण देऊ शकतात.

देणगीचे स्वरूप
आपण महिन्याला जी देणगी देणार आहोत ती पद्धत गुरूपीठाकडून अत्यंत सोप्या पद्धतीची करण्यात आलेली आहे. आपल्याला केंद्रात प्रतिनिधी सेवेकरी तर्फे बँकेचा एक फॉर्म दिला जाईल तो आपल्याला फक्त एकदाच भरून द्यावयाचा आहे . त्यात आपण आपला बँक अकाऊंट नंबर ,बँकेला लिंक असलेला मोबाइल नंबर व आयएफएससी कोड अचूक नमूद करावे . तसेच आपल्याला दर महिन्याला द्यावयाची असलेली देणगी रक्कम व ती किती तारखेला द्यावयाचा आहे त्याची तारीख देखील नमूद करावी . सोबत बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक किंवा चेक ची झेरॉक्स द्यावी. (अचूक अकाउंट नंबरसाठी). वरील माहिती भरून दिल्यानंतर दर महिन्याला ही रक्कम आपण दिलेल्या तारखेला प्रत्यक्ष स. मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या अकाऊंटला जमा होईल. त्याचवेळेस आपल्याला आपल्या मोबाइलवर आपण देणगी जमा केली याचा रितसर मेसेज येईल. असा हा उपक्रम सर्व सेवेकरयांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने गुरुपीठातर्फे सुरु करण्यात येत आहे. इतर पद्धतीने मिशन एक रुपया अंतर्गत केंद्रात देणगी स्वीकारू नये ही नम्र विनंती तरी ही माहिती आपण सर्व सेवेकाऱ्यांंपर्यंत भाविकांपर्यंत पोहोचवून मिशन १ रुपया उपक्रम यशस्वीरित्या राबवुन ईश्वरीय कार्यात सहभागी व्हावे .

सेवेकरी बंधू भगिनींनो परमपूज्य गुरुमाऊलींच्या एक आशीर्वाद आपण सर्वांनी लक्षात ठेवावा हॉस्पिटलच्या कार्यात जो तनमनधनाने सहभागी होईल त्याला कधीही हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही.

offline देणगीसाठी बँक माहिती:
शाखा: त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
नाव: स. परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट डोनेशन अकाऊंट
करंट खाते क्र. ३८१८४२४६२८३
आय.एफ.सी. कोड: SBIN0006292

टीप: सदर देणगीवर आयकर माफ असेल. बँक A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच / ईमेलवर स्कॅन पावती पाठवण्यात येईल. तसेच कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीकडे आपण देणगी जमा न करता वरील माध्यमातूनच देणगी व सविस्तर पावती घ्यावी.