आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र, श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर. अधिक माहिती..!

सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत 

 ५० खाटांचे व २४ तास सेवा सुविधा असलेले एकमेव आध्यात्मिकआयुर्वेदिक उपचार केंद्र “, श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (नाशिक) महाराष्ट्र.

१) अभ्यंगम: शरीरातील स्नायू सैल होतात, सांध्यांचा व्यायाम होतो, शरीराचा कडकपणा कमी होतो, रक्त पुरवठा चांगला होतो, त्वचेला तेज येते. वात व कफ कमी करण्यासाठी सर्व विकारांवर उपयुक्त.

२) स्वेदन: शरीराचा जडपणा कमी होतो. शरीराचे रंध्र (होल्स) मोकळे होतात व टोक्ससिन्स (विषारी घटक) बाहेर पडतात. शरीरातील मेद (फॅॅट) कमी करण्यासाठी उपयुक्त.

३) शिरोधारा: डोकेदुखी, नेत्रविकारं, कर्णविकार, ह्रदयरोग , अनिद्रा, मानसिक दोष, हात व  पायांच्या भेगा, ‘मनाची अस्थिरता यावर उपयुक्त.

४) वमन: जुनी सर्दी, अ‍ॅलर्जी, पित्त, स्त्रीपुरुष वंधत्व, हृदयरोग, मधुमेह कॅन्सर आणि स्वास्थ रक्षणार्थ उपयुक्त.

५) पिंडस्वेद: वातविकार, पॅरॅलिसीस, संधिवात, दुर्बलता, शारीरिक दुर्बलता तसेच वेदना व अशक्तपणा यावर उपयुक्त.

६) विरेचन: पित्त विकार, रक्त, त्वचा विकार, शरीराचा दाह, काविळ, मधुमेह, रक्तदाब, उदर, मुळव्याध, संधीविकार, पक्षाघात, वंधत्व यावर उपयुक्त.

७) बस्ती: वय:स्थापन, वर्ण-बल-आरोग्य- आयुष्य यांच्या वृध्दीसाठी, सांधेविकार, सायटीका, कटीशूल, पक्षाघात, स्पॉन्डीलायटीस, अर्थरायस, मलावरोध, शुक्रदृष्टी, वंधत्व, ट्यूबल ब्लॉक, पी.सी.ओ.डी.

८) जानुबस्ती: गुडघेदुखी, गुडघ्याची झिज होणे (कॅल्शिअम कमी होणे) गुडघ्याच्या वाटीची समस्या व गुडघ्यांच्या सर्व विकारासाठी उपयुक्त.

९) कटीबस्ती: पाठीच्या मणक्यांचे सर्व विकार, पाठ-मान, कंबरदुखी, सायटिका, स्पॉडिलिसीस् व नसांच्या सर्व विकारासाठी.

१०) हृदयबस्ती: हृदयास बल देऊन, स्नायुंची सहनशक्ती वाढते.

११) नस्य: जुनाट सर्दी, अर्धशिशी, शिर:शूल, अर्दित, नासा रोग, केस गळणे, पिकणे, कर्णरोग, नेत्ररोग, अपस्मार इ.

१२) रक्तमोक्षण: त्वचारोग व वात विकार, शरीरातून दुषित रक्त शरीराबाहेर काढले जाते.

१३) नेत्र-तर्पण: दृष्टी विकार, डोळ्यांची जळजळ, डोळे दुखणे, डोळ्यांतील जखम.   

अधिक माहितीसाठी :

संपर्क: 

मोबाईल: ९९२२४२०००४

ईमेल: ayuhospital@gurupeeth.in   /  moredadahospital@gurupeeth.in

पत्तासद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्ट, श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर , नाशिक (महाराष्ट्र)